profile

/>


 
                  

     माझ्याबद्दल            

मी शुभम मल्लिनाथ वाघोळे
संस्थापक – SMART CNC ACADEMY

माझं शिक्षण M.Com + ITI Machinist + MASTER IN CNC आहे. 2020 मध्ये मी ITI पूर्ण केलं. ITI मध्ये शिकत असताना माझे शिक्षक श्री. युवराज सोडलं सर यांनी मला CNC MACHINIST या विषयाची खरी आवड लावली. त्या दिवसापासून मला शिकवण्याची आणि शिकण्याची प्रेरणा मिळाली. (Thank you so much Sir!)

         जेव्हा सर वर्गाला येत नसत, त्या दिवशी मी स्वतः विद्यार्थ्यांना शिकवायचा प्रयत्न करायचो. त्याच काळात मी माझं YouTube चैनल सुरू केलं आणि माझ्या शिक्षककी प्रवासाची खरी सुरुवात झाली.

ITI पूर्ण केल्यानंतर मी Apprenticeship केली आणि 2021 मध्ये एका Institute मध्ये CNC Programming Advanced Training घेतलं. तेथे मला सखोल ज्ञान मिळालं आणि त्याचवेळी माझ्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे मला Teaching ची संधी मिळाली.

2021 पासून ते आजपर्यंत (2025) मी सतत CNC संबंधित शिक्षण देत आहे. आतापर्यंत मी 1000+ विद्यार्थ्यांना ऑफलाइन प्रशिक्षण दिलं असून सध्या पुण्यातील ३ प्रतिष्ठित संस्थांशी जोडलेला आहे:

  • Antech Technology Institute
  • CAD Desk, Hadapsar
  • Vikas Infotech Pvt. Ltd.

याशिवाय माझं स्वतःचं ऑनलाइन प्लॅटफॉर्म – Smart CNC Academy देखील यशस्वीपणे चालत आहे. मी रोज Practical करतो, नवनवीन गोष्टी शिकतो आणि तो अनुभव माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो.

🎯 माझा ध्यास

  • मराठी भाषेत CNC शिकवणं
  • महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत CNC शिक्षण पोहोचवणं

तसेच, मी Smart CNC Programming Techniques वर सतत संशोधन करतो – कमी वेळेत अचूक आणि कार्यक्षम पद्धतीने CNC Programs तयार करता येतील अशा Systems विकसित करणं हे माझं मुख्य उद्दिष्ट आहे...

✨ नेहमी शिकत राहा ✨
“शिकणं हीच खरी संपत्ती आहे,
जितकं शिकशील तितकं वाढशील,
जगाच्या स्पर्धेत टिकायचं असेल,
तर नेहमी शिकत राहा, थांबू नकोस कधीही.”

HAPPY STUDENT:- 



















✨ Thank you so much 🙏🙏 ✨

आज मी ज्या टप्प्यावर आहे, तिथे पोहोचण्यासाठी अनेक जणांनी मला थेट वा अप्रत्यक्ष साथ दिली आहे. त्यांच्याप्रती माझ्या मनात मनापासून कृतज्ञता आहे.

  • माझे शिक्षक वर्ग, ज्यांनी मला ज्ञान दिलं आणि योग्य मार्गदर्शन केलं.
  • माझे मित्र–मैत्रिणी, ज्यांनी नेहमी पाठिंबा दिला.
  • माझे सहकारी आणि पाहुणेरावळे, ज्यांनी प्रेरणा दिली आणि अनुभव वाटला.
  • माझे कुटुंबीय, ज्यांनी माझ्या प्रत्येक पावलावर साथ दिली.

आज मी जो काही शिकलो आहे, आणि Smart CNC Academy उभारू शकलो आहे, ते या सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य झालं आहे. माझा विश्वास आहे की शिक्षण आणि ज्ञानाचा प्रवास हा कधीच एकट्याचा नसतो – तो नेहमी आपल्या सभोवतालच्या लोकांच्या योगदानाने समृद्ध होतो.

सर्वांचा मनापासून आभारी आहे! 💐